पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे यांचे निधन
पनवेल- पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे यांचे निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ५६ होते.मृत्यूनंतर पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.विश्वास म्हात्रे यांच्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभारही देण्यात आला होता.विश्वास म्हात्रे यांच्या निधनामुळे पनवेल पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.विश्वास म्हात्रे हे उरण तालुक्यातील कोप्रोली गावाचे होते.
Post a Comment