News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल तालुक्यातील ५ लेडीज सर्व्हिस बार व ऑर्केस्ट्रावर पोलिसांची कारवाई ... एकाच दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बारचालकांचे धाबे दणाणले

पनवेल तालुक्यातील ५ लेडीज सर्व्हिस बार व ऑर्केस्ट्रावर पोलिसांची कारवाई ... एकाच दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बारचालकांचे धाबे दणाणले

पनवेल दि.१३ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील ५ वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लेडीज सर्व्हिस बार व ऑर्केस्ट्रा यांच्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवार रात्री कारवाई केली आहे. 

त्यामध्ये साईराज (गोपिका बार) येथील २६ महिला वेटर,१७ पुरुष वेटर, १४ ग्राहक व १ मॅनेजर यांच्यावर भादंवि कलम २९४ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तर चांदणी (साईनिधी बार व ऑर्केस्ट्रा) यातील ११ महिला वेटर, २ पुरुष वेटर, १ मॅनेजर, ३ ग्राहक व १ बारमालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खान्देश्वर पोलीस ठाणे हद्दीतील इंटरनेट बार आस्थापनेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ प्रमाणे ४ महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील बार व आस्थापना या विशेष पथकाने अचानकपणे तपासणी केली असता चाणक्य ऑर्केस्ट्रा बार यातील ३ ऑर्केस्ट्रा महिला गायकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याबद्दल म.पो.अधिनियम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कपल ऑर्केस्ट्रा बार येथील २ महिला शहर पोलीस ठाणे हद्दीतील बार व आस्थापना या विशेष पथकाने अचानकपणे तपासणी केली असता चाणक्य ऑर्केस्ट्रा बार यातील ३ ऑर्केस्ट्रा महिला गायकांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याबद्दल म.पो.अधिनियम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.एकाच दिवसात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बारचालकांचे धाबे दणाणले आहे

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment