News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उत्तम आरोग्यासाठी हास्य आवश्यक - व्याख्याते चद्रशेखर वझे ... नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे हास्यचिंतन कार्यक्रम

उत्तम आरोग्यासाठी हास्य आवश्यक - व्याख्याते चद्रशेखर वझे ... नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे हास्यचिंतन कार्यक्रम

पनवेल - हसण्याला आपल्या जीवनात अपरंपार महत्त्व असून उत्तम आरोग्यासाठी हास्य आवश्यक असल्याचे मत सुप्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर वझे यांनी नवीन पनवेल येथे व्यक्त केले.नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे छोट्या-छोट्या गोष्टीतून हसत-खेळत चिंतन करावयास लावणाऱ्या हास्यचिंतन कार्यक्रमात वझे बोलत होते.

यापुढे बोलताना वझे म्हणाले, आपल्या दैनंदिन जीवनात अवतीभवती घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांकडे अंतर्मुख होऊन डोळस नजरेने बघितल्यास आपल्याला हसत-खेळत चिंतन करून हास्यानंद मिळतो असे सांगून माणूस कसा हसतो यावर त्याचे व्यक्तिमत्त्व अवलंबून आहे.हसू न शकणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करू नका.हसत हसत दुसऱ्याला न दुखवता एखादी गोष्ट सांगणे हा शांतता प्रस्थापित करण्याचा चांगला उपाय आहे.

आजच्या बदलत्या जीवनशैलीविषयी बोलतांना ते म्हणाले, इंग्रजी माध्यमामुळे मराठी भाषेतील आनंददायी बारकावे मुलांना कळेनासे झालेत.पूर्वी आणलेला खाऊ सगळ्या भावंडांना वाटून मग तू खा असं सांगितलं जायचं तर अलिकडे हे तुझ्यासाठी आणि ते त्याच्यासाठी असं सांगितलं जातंय. यातूनच धोकादायक असे एकाकीपण आणि भांडणाची बीजे पेरली जातात असे वझे यांनी सांगितले.

सांस्कृतिक मंचांविषयी ते म्हणाले,निःस्वार्थी कार्यकर्ते हे सामाजिक कार्य करणाऱ्या सांस्कृतिक मंचांची प्रेरणा आहेत. यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण आपले योगदान द्यावे. दुसऱ्यांना देणं हा भारतीय जीवनपद्धतीने दिलेला संस्कार आहे हे लक्षात घेऊन अशा सांस्कृतिक संस्थांना आर्थिक मदत केल्यास त्यांना स्थैर्य लाभून चांगले कार्य उभे राहील व त्यास आपले योगदान असल्याचा आनंद मिळेल असे शेवटी व्याख्याते वझे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अत्रे कट्ट्याचे अरविंद करपे यांनी केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment