News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना नेते बबन पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना नेते बबन पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन

पनवेल -(संजय कदम) ः शिवसेनेचा जन्मच मुळी न्याय हक्काच्या लढाईसाठी झाला आहे.हा लढा लढत असताना अनेेक वेळा शिवसैैनिकांवर केसेस होतात. परंतु आता आपल्याला त्याची भिती नाही, कारण कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयातून शेकडो तरुण आता दरवर्षी वकील म्हणून बाहेर पडतील व ते शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील, असा विश्‍वास तळोजा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेली 27 वर्ष बबन पाटील हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना मोफत गणवेश, वह्या पुस्तके, पोषण आहार दिला जात आहे. हे काम त्यांचे कौतुकास्पद आहे. सध्या देशात काय चाललयं, राज्यात काय चाललयं याची कल्पना सर्वांना आहे. न्याय मिळण्यासाठी वर्षोनुवर्षे वाट बघावी लागत आहे. इंग्रज काळात सुरू असलेले कायदे आजही अंमलात आणलेे जात आहेत. यात फेरबदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

तर यावेळी बोलताना शिवसेना नेते मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी सांगितले की,अभिमान वाटावा अशी शिक्षण संस्था बबन पाटील यांनी येथे उभारली आहे, ते सच्चे शिवसैैनिक असून शिवसेनेशी पाटील कुटुंबिय ठामपणे आजही उभे आहेत.त्यांनी हे विधी महाविद्यालय सध्या उभारले आहे,आगामी काळात शैक्षणिक विद्यापीठ निश्‍चितच उभे राहील व या उभारणीसाठी आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. तर यावेळी प्रास्ताविकात बोलताना संस्थेचे अध्यक्ष बबन पाटील यांनी सांगितले की, शिवसेनाप्र्रमुखांना अभिप्रेत असलेली इमारत आज उभारताना मला अत्यानंद होत आहे, आज प्रामुख्याने त्यांची व मॉ साहेबांची आठवण येत आहे. त्यांचे सुपूत्र उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते या महाविद्यालयाचे उद्घाटन होत असल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे. गेली 27 वर्षे अविरत मेहनत करून शैैक्षणिक संस्था या परिसरात वाढविण्याचे काम केले आहे. आगामाी काळात शांत न राहता बाळासाहेब विद्यापीठ काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांंगितले.

या कार्यक्र्रमाला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ.सचिन अहिर,आ.जयंत पाटील,शिवसेना नेते मिलींद नार्वेकर,मा.आ.बाळाराम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,जगदीश गायकवाड,उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,गणेश पाटील, कैलास पाटील, दिनेश पाटील, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील,विभागप्रमुख गणेश म्हात्रे, मा.नगरसेेवक अतुल पलण, बाळाराम मुंबईकर आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment