News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची फेरनिवड....लंडन येथे झालेल्या फेडरेशनच्या कार्यक्रमात निवड

इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची फेरनिवड....लंडन येथे झालेल्या फेडरेशनच्या कार्यक्रमात निवड

पनवेल-इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची फेरनिवड करण्यात आली आहे.लंडन येथे झालेल्या फेडरेशनच्या कार्यक्रमात ही निवड करण्यात आली आहे.

गेली ३८ वर्ष कामगार कल्याणासाठी आहोरात्र झटणारे, हजारो कामगारांचे संसार सुखी करणारे NMGKS संघटनेचे अध्यक्ष,राष्ट्रीय इंटकचे चिटणीस कामगार नेते महेंद्र घरत यांच्या या फेरनिवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या महेंद्र घरत याच्या निवडीमुळे रायगड जिल्हयात विशेषत: पनवेल- उरण तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
१९८७ साली लोकनेते स्व.दि. बा. पाटील, कामगार नेते स्व.दत्ता सामंत, स्व.दत्ता पाटील, स्व.दत्तुशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझगाव डॉकच्या कामगारांसाठी  लढा उभारून त्यांना कायम करून वयाच्या विसाव्या वर्षी आपल्या कामगार क्षेत्रातील झंझावाती कारकीर्दीची सुरवात केली. ३८ वर्ष न थकता न दमता कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेला वसा अखंडपणे त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. आपल्या संघटनेच्या १५००० कामगारांचे जे.एन.पी.टी, तळोजा, पाताळगंगा, बेलापूर, महाड, पेण या औद्योगीक वसाहतींमध्ये नेतृत्व करत असताना महाराष्ट्र इंटक, राष्ट्रीय इंटक, जगातील शिर्ष संघटना ILO वर भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजची त्यांची निवड त्यांच्या कामगार क्षेत्रातील कामगिरीची पोचपावतीच आहे. 

रायगड कॉंग्रेसची धुरा सांभाळत संघटनेच्या माध्यमातून हजारो युवकांना उदर निर्वाहाचे साधन त्यांनी मिळवून दिलेले आहेत. तर सामाजिक, कला, क्रीडा, धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या प्रचंड कार्यामुळे ते सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत.त्यामुळे रायगड जिल्हात आनंदमयी वातावरण आहे.भारतीय कामगार क्षेत्रातील हि मान उंचावणारी घटना आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment