कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेतर्फे पोपटी कवी संमेलनाचे आयोजन
पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेतर्फे पनवेलजवळील विचुंबे गावात पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कवी संमेलनाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी गटनेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे, रायगडभूषण कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्रा.एल.बी.पाटील उपस्थित राहणार आहेत.या कवी संमेलनास कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.
Post a Comment