News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे व गायत्री दातार शनिवारी पनवेलमध्ये .... जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे हळदीकुंकूचे आयोजन

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे व गायत्री दातार शनिवारी पनवेलमध्ये .... जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे हळदीकुंकूचे आयोजन

पनवेल-जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या आयोजनाखाली हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.पनवेलमधील व्ही.के.हायस्कूलच्या पटांगणावर 10 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवारी संध्याकाळी 5:00 वाजता या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मैत्रिणींना थोडा विरंगुळा मिळवून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सोबतच हसत खेळत भरघोस बक्षिसं लुटावी आणि खऱ्या अर्थी त्यांची ओळख आनंदाच्या ह्या हळदी कुंकू कार्यक्रमात निर्माण व्हावी यासाठी आपल्यामध्ये प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कोठारे व गायत्री दातार या येणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की यायचं हे आग्रहाचे निमंत्रण सौ.ममताताई प्रितम म्हात्रे यांनी दिले आहे. 
आपल्याकडे पनवेलची ओळख एक ऐतिहासिक भूमी म्हणून आहे.आपली संस्कृती आणि कलेचा वारसा आपण नेहमीच जोपासला पाहिजे या उद्देशाने जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आम्ही हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.पनवेल सोबतच ग्रामीण भागातील महिलांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. 
श्री.प्रितम जे. म्हात्रे 
(अध्यक्ष:-जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था)

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment