प्रेम संबंधात अपयश आल्यानं टोकाचं पाऊल ...तळोजा येथील तरुणीची उड्डाणपुलावरून पाण्यात उडी; रुग्णालयात उपचार सुरु
पनवेल (वार्ताहर): तळोजा येथील एका तरुणीने प्रेम प्रकरणातून फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात उडी मारल्याची घटना घडली असून नागरिकांनी तातडीने दाखवलेल्या तत्परतेमुळे तिला त्वरित उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
एका तरुणीनं प्रेम संबंधात अपयश आल्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे.तळोजा फेज १ ला तळोजा फेज २ शी जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून तरुणीने पाण्यात उडी घेतली.हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित नागरिकांच्या कॅमेऱ्याने टिपला आहे.प्रियकरासोबत वाद झाल्याने ही तरुणी फ्लायओव्हरवर वरून उडी मारण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तिच्या बचावासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.उडी मारू नको... असे तिला अनेकांनी बजावले. मात्र तिने कोणाचंही न ऐकता थेट पाण्यात उडी घेतली. प्रेम प्रकरणातून तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती याबाबत समोर येत आहे.दरम्यान, नदीत पाणी नसल्याने ती पाण्यात न पडता थेट जाऊन दगडावर पडली.यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळी उपस्थित पोलीस व स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नांमुळे या तरुणीचे प्राण थोडक्यात बचावले आहे व तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Post a Comment