महापालिका कार्यक्षेत्रात ‘स्वच्छ तीर्थ अभियान’....... एनजीओ,सामाजिक संघटना,गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांनीही सहभाग होण्याचे आयुक्तांचे आवाहन
पनवेल : केंद्र शासनाच्या सुचनेनूसार ‘स्वच्छ तीर्थ अभियान’ पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक 14 जानेवारीपासून राबविण्यास सुरूवात झाली असून या अभियानांतर्गत चारही प्रभागातील मंदिरे,मंदिराच्या आजूबाजूचा परिसर,रस्ते,चौक,गार्डन या ठिकाणची स्वच्छता करण्यात येत आहे.याची सविस्तर माहिती देण्याकरिता दिनांक 15 जानेवारी रोजी मुख्यालयातील बैठक सभागृहामध्ये आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली चारही प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त उपायुक्त डॉ.वैभव विधाते,अभियंता अनिल कोकरे,चारही प्रभाग अधिकारी,मुख्य स्वच्छता निरीक्षक,चारही प्रभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत डिप क्लिन ड्राईव्ह घेण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या 15 दिवसांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून प्रत्येक प्रभागामध्ये यासाठी ‘सुपर 150’ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक, या अभियानांतर्गत प्रत्येक प्रभागातील मंदिरे , मंदिराच्या आजूबाजूचा परिसर,रस्ते, चौक, गार्डन याठिकाणची स्वच्छता करत आहेत.या अभियानांतर्गत दिनांक 14 जानेवारी रोजी 24 मंदिरांची व दिनांक 15 जानेवारी रोजी 30 मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानांमध्ये विविध एनजीओ, विविध सामाजिक संघटना,गृहनिर्माण सोसायट्या, नागरिकांनीही सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.
मंदिरांची स्वच्छता करण्याच्या हेतूने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ तीर्थ अभियानाची घोषणा केली आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अभियानांतर्गत सर्व मंदिरांच्या आतील भाग व मंदिराचा परिसराची स्वच्छता त्याचबरोबरीने ,रस्ते, चौक, गार्डन यांची स्वच्छता, रस्त्यावरील डेब्रिज हटवणे, रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, चौक सुशोभित करण्यात येणार आहे.
Post a Comment