ऍक्सिस बँकेतून बोलतोय .... खातेदाराच्या खात्यातून ७ लाख रुपये वळते
पनवेल : ऍक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे केवायसी केले नसल्यामुळे बँक खाते बंद होईल असे फिर्यादीस सांगून स्वतःच्या फायद्याकरिता ७ लाख ७ हजार २०० रुपये त्याच्या खात्यातून वळते करून सदर तक्रारदाराची फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.उदय धाकड यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अनोळखी इसमाने ऍक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे केवायसी केले नसल्यामुळे बँक खाते बंद होईल असे त्यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या इमेलवर आलेला ओटीपी संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून स्वतःच्या फायद्याकरिता सदर अनोळखी इसमाने ७ लाख ७ हजार २०० रुपये त्याच्या खात्यातून वळते करून त्यांची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Post a Comment