पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष; फटाके फोडून आणि पेढे भरवून केला आनंदोत्सव
पनवेल -: शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देताच पनवेलमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि पेढे भरवून केला आनंदोत्सव साजरा केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हिच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून त्याचाच आधार घेत आणि शिवसेनेच्या घटनेचा विचार करता केवळ पक्षप्रमुख म्हणून एक व्यक्ती कुणाचीही पक्षातून हाकालपट्टी करू शकत नाही असे सांगत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी फेटाळून लावली आहे. शिंदेसह ठाकरे गटाचे सर्वच आमदार नार्वेकर यांनी पात्र ठरविले आहेत. आमदार भरत गोगावले हेच शिवसेनेचे प्रतोद आहेत असे देखील विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले आहे.
हा निकाल जाहीर होताच पनवेलमध्ये शिवसैनिकांनी आंदोस्तव साजरा केला.यावेळी पनवेल महानगर प्रमुख ॲड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे,पनवेल शहर संघटक अभिजित साखरे,उपशहर संघटक सिद्धेश खानविलकर, प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर,विभाग प्रमुख अविनाश साफल्य, शाखा प्रमुख प्रतीक वाजेकर, किरण पवार,किरण काळवेकर, हितेंद्र पेंडंकर, दीपेश नव्दारे, सुमित कदम, मंगेश दांडेकरी, युवा सेनेचे गुलाब बागवान, अनिकेत जेस्वाल यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment