दिपक फर्टिलायझर्सचा हरित ऊर्जा उपक्रम; शाश्वततेवर अधिक भर देणाऱ्या उद्योगांमध्येसुद्धा आघाडीवर
पनवेल : सुरक्षित व टिकावू उत्पादने विकसित कारण्याबाबतचा दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा दृष्टीकोन भारताच्या हवामान बदल विरुद्धच्या लढ्यातील राष्ट्रीय उद्दीष्टांशीदेखील पूर्णपणे संलग्न आहे. देश शाश्वतता आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाची जबाबदारी सक्रियपणे सांभाळत असतानाच शुद्ध आणि अधिक शाश्वत ऊर्जा इकोसिस्टम प्रती योगदान देणाऱ्या ऊर्जा ग्रिडला हरित करण्याप्रती दीपक फर्टिलायझर्स कटिबद्ध असून उत्पादन विकासासाठी नाविन्यपूर्ण मार्गाचा शोध घेत असताना, केवळ सुरक्षितताच नव्हे तर पर्यावरणपूरक अशाप्रदानीत सेवा खात्रीपूर्वक देण्यास दीपक फर्टिलायझर्स समर्पित आहे.असे करत असताना हरित भविष्याप्रती योगदान देण्याबरोबरच हि कंपनी शाश्वततेवर अधिक भर देणाऱ्या उद्योगांमध्येसुद्धा आघाडीवर आहे.दिपक फर्टिलायझर्सचे तळोजास्थित उत्पादन कारखाना स्वनिर्मित उत्पादन यादीचाअविभाज्य भागआहे जेथे आय.पी.ए, नायट्रिक अँसिड, अमोनिया,एन.पी.के. तसेच ए.एन.पी.खते आणि टेक्निकल अमोनियम नायट्रेट यासारख्या विविध श्रेणीतील रासायनिक उत्पादनांचासमावेश आहे.येथील उत्पादन सुविधांमुळे हे कंपनीचे सर्वात मोठे उत्पादन केंद्र ठरतेव त्यातच त्याचे धोरणात्मक महत्त्वसूचित होते.तळोजास्थित के १ - के ८ प्लॉटवरील कारखान्यांच्या सहाय्यास, १२ एमव्हीए इतक्या सर्वोच्चमागणी सोबतच ग्रिडमधून १४ एमव्हीए इतकी करारबद्ध वीज मागणीची सुविधा आहे. येथे शाश्वतताव अक्षय ऊर्जा अवलंबनाप्रती असलेली कटिबद्धतापाहुन दिपक फर्टिलायझर्सने हरित ऊर्जा वापरावर भर देण्याची संधी ओळखून तिचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. सध्या दिपक फर्टिलायझर्सच्या तळोजातील कारखान्याची वीजेची मागणी ही प्रभावीपणे ४० टक्केइतकी अक्षय ऊर्जास्रोतांच्या माध्यमातुन पूर्ण केली जात आहे. ही उपलब्धी दोन प्रमुख उपक्रमांच्यामाध्येमातून शक्यझाली आहे पहिल्या उपक्रमात, महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथील १० एमडब्ल्यू इतकी एकत्रित स्थापितक्षमता वाढवणाऱ्या दिपक फर्टिलायझर्स संचालित आठ पवनचक्यांचा समावेश आहे तर दुसरा उपक्रम हा सौरऊर्जासाठी मेसर्स अवाडाएनर्जी बरोबर केलेल्या खुल्या प्रवेश करारावर आधारित आहे व २०४६ सालापर्यंतच्याया विस्तारित करारन्वये ५.३९ एमडब्ल्यू इतकी लक्षणीय स्थापित क्षमतेच्यावीजनिर्मितेचे लक्ष्य ठेवले आहे. १५.३९ एमडब्ल्यू इतक्या एकत्रीत स्थापित क्षमतेसह हे प्रकल्प दिपक फर्टिलायझर्स तळोजा के १ येथे पारंपारिक विद्युत ऊर्जेचा वापर कमी करण्याप्रती सक्रियपणे योगदान देतात.जीवाश्मसहितआणि जीवाश्मरहित मिश्र इंधनस्रोतांमुळे, सामान्यत: पारंपारिक विद्युत ग्रिडमध्ये कार्बन पदचिन्हाचे प्रमाण उच्च असते तर सौर आणि पवनऊर्जा निर्मित वीजेपासून अक्षरश:शून्य कार्बनडायऑक्साईडचे उत्सजर्न होते आर्थिक वर्ष २०२३ मध्ये के१-के६ कारखान्यांनमधे एकूण वीजवापरातील ४२ टक्के इतका वाटा अक्षय ऊर्जेचा होता (२.३ करोड युनिटसंख्या) अक्षय ऊर्जेचा या लक्षणीय बदलामुळेच आर्थिक वर्ष २०२३मध्ये दीपक फर्टिलायझर्सला सुमारे १८.७४५ मेट्रिक टन इतक्या कार्बनडाय ऑक्साईडच्या उत्सर्जनासप्रतिबंध करता आला. हरीतऊर्जा आणि शाश्वततेप्रती असलेली दीपक फर्टिलायझर्सची कटिबद्धता हे केवळ जागतिक हवामान उद्दीष्टांशीचसंलग्न राहिलेले नसून त्याने शाश्वततेस अधिकाअधिक प्राधान्य देऊन यशस्वी बनवण्याबाबतीत कंपनीला अग्रस्थानी आणून बसविले आहे. हवामान लवचिकतेबाबतआपण एकत्रपणे प्रयत्न करत असताना,DFPCL चे उपक्रम आणि वचनबद्धता कंपनीच्या नेतृत्वाबाबत आणि पर्यावरणविषयक जबाबदारी बाबत एक उत्तम उदाहरण आहे.
Post a Comment