अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ...अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना श्रीरामाचा प्रसाद ....प्रितम जे.म्हात्रेंनी जोपासली सामाजिक बांधिलकी
पनवेल-अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पनवेल तालुक्यातील अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना श्रीरामाचा प्रसाद दिला.
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा
सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्यात आली.कुठे श्रीरामांची भक्ती गीते आणि कथा,तर काहींनी मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करत होता.
पनवेल महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जे.म्हात्रे यांनी नेहमीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आज पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचा वनवास संपला, परंतु आजही आपल्याच पनवेल परिसरात पोटच्या मुलांना मोठे करूनही उतार वयातील आयुष्यात एकटेच वनवासरूपी आयुष्य जगत असलेले त्या वृद्धाश्रमातील आपले आजी-आजोबा यांना सुद्धा प्रभू श्रीरामांचा प्रसाद आज श्री.प्रितम म्हात्रे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी श्रीरामांच्या आशीर्वादाने पोहोचवला.यावेळी त्यांनी स्वतः इतर मित्र परिवारांच्या सोबतीने पनवेल परिसरातील स्नेहकुंज, शुभम,साईआश्रय,जनधर्म,करुनेश्वर,वात्सल्य,शिवाश्रय, आधारपुष्प,वर्लेश्वर,बालग्राम आणि कमल अर्णव चॅरिटेबल संस्थेचे अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले व प्रसाद दिला.वृद्धांची आस्थेने चौकशी केली त्यांच्याशी गप्पा मारल्या.
यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामाचा उत्सव साजरा करत असताना केलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
आश्रमातील वृद्धांसोबत यावेळी घालवलेल्या काही क्षणांमुळे मनात एक वेगळे चैतन्य निर्माण झाले.नातवंडांना खेळवण्याच्या वयात वृद्धाश्रमातील चार भिंतीत आयुष्य काढत असलेल्या वृद्धांना आज संपूर्ण भारत दिवाळीचा उत्सव साजरा करत आहे त्याच उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी हा विचार मी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत प्रत्यक्षात उतरवला. उतार वयातील त्यांच्या वनवासात त्यांना आपलेपणा दाखवण्याची आवश्यकता आहे हे मला जाणवले. तरुणांना विनंती आहे की अशाप्रकारे घरातील ज्येष्ठांना कधीच वनवासात एकटे सोडून घरात दिवाळी करू नका.
प्रितम जे.म्हात्रे
माजी विरोधी पक्षनेता
पनवेल महानगरपालिका
Post a Comment