बंद खोलीत गळा चिरलेला आढळला मृतदेह : पनवेलजवळील बंबावी येथील घटना
पनवेल ( संजय कदम ) : पनवेलजवळील बंबावी येथील एका खोलीत गळा चिरलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
सदर इसमाचे नाव रमेश हे असून अंदाजे वय ३५ ते ४० दरम्यान आहे सदर इसम हा गेल्या काही दिवसापासून आजारी होता तसेच मनोरुग्ण असल्याचे समजते व तो त्या भागातील एका कॉरीवर कामाला होता . त्याचा मृतदेह तेथे असलेल्या बैठया चाळीतील एका खोलीत गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे तसेच त्याच्या मृतदेहाच्या बाजूला चाकू आढळला आहे. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन आजूबाजूला या इसमाबाबत चौकशी सुरु केली आहे . या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Post a Comment