पनवेल तालुका पोलिसांनी देशी विदेशी मद्य विकणाऱ्यांवर केली कारवाई
पनवेल (संजय कदम): पनवेल तालुक्यातील कल्हे गावाच्या हद्दीत तसेच कानपोली गावाच्या हद्दीत देशी विदेशी मद्य साठा करून त्याची विक्री करत असल्या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील याना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्हे गावातील एक पान टपरी विक्रेता त्याच्याकडे देशी दारू संत्रा तसेच मॅकडॉल दारू ही विक्रीसाठी बेकायदा ठेवत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून ती देशीदारू संत्रा व मॅकडॉल दारू असा मीळून जवळपास २ हजार रुपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील कानपोली गावाच्या हद्दीत राहणारा एक इसम गावठी दारूचा साठा जवळपास बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकून ५ लिटर गावठी दारू ज्याची किंमत जवळपास ५०० रुपये इतकी आहे हस्तगत करण्यात आली आहे. या दोन छाप्यामुळे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Post a Comment