ओरायन मॉल पनवेलकरांचे वैभवच - अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ...शॉप अँड विन कॉन्टेस्ट लकी ड्रॉ द्वारे ग्राहकांवर बक्षिसांचा वर्षाव
पनवेल - जागतिक तसेच भारतीय सुप्रसिद्ध कंपनीची उत्पादने ओरायन मॉलमध्ये उपलब्ध आहेत,त्यामुळे पनवेलकरांना मुंबई-नवी मुंबईमध्ये जाण्याची गरज नाही.भव्य-दिव्य स्वरूप पाहता ओरायन मॉल हे पनवेलकरांचे वैभवच आहे असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी पनवेल येथे व्यक्त केले.
पनवेल शहरातील ओरायन मॉलतर्फे मॉलमध्ये दिवाळीनिमित्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ मार्फत मोठ्या स्वरूपात बक्षीस दिली जातात,
यावेळी शॉप अँड विन कॉन्टेस्टचा लकी ड्रॉ अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या हस्ते काढण्यात आला.या कार्यक्रमास ग्राहक आणि प्रेक्षकांची गर्दी होती.यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर,दिलीपभाई करेलिया,मनन परुळेकर उपस्थित होते.
याप्रसंगी ओरायन मॉलचे कौतुक करताना अपूर्व नेमळेकर यांनी सांगितले की,नामांकित कंपन्यांचे आऊटलेट येथे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत.मंगेश परुळेकर व त्यांची टीम वर्षभर ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर,स्कीम राबवत असतात. मी अनेक मॉल पहिले पण हा एक वेगळ्या धाटणीचा मॉल आहे. येथे ग्राहक आल्यावर तो रिकाम्या हाताने परत जात नाही हि यांची खासीयत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानिमित्ताने त्यांच्या हस्ते शॉप अँड विन कॉन्टेस्टचा लकी ड्रॉ काढण्यात आला.त्यामध्ये प्रथम पारितोषिक होंडा कंपनीची बाईक तुषार याला देण्यात आली तर द्वितीय आय फोन प्रो १५ बालटू यादव याला मिळाले तर तृतीय पारितोषिक अँपल वॉच स्वराज (कर्जत) याला मिळाले आहे. त्याचबरोबर यावर्षी विक्रम लँडर येथे हुबेहूब साकारण्यात आले होते.हे पाहण्यासाठी पनवेलकरांनी मोठी गर्दी केली होती.
Post a Comment