नवीन पनवेलमध्ये रायगड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळांचे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन : रायगड जिल्हा परिषद व डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन यांचे आयोजन
पनवेल - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सप्ताहाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद व डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळांचे नवीन पनवेलमध्ये येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता नवीन पनवेलच्या के.आ.बांठिया विद्यालयाच्या पटांगणावर ही स्पर्धा होणार आहे.सदरच्या स्पर्धेची माहिती नवीन पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ.नंदकुमार जाधव यांनी दिली.यावेळेस फाउंडेशनचे सेक्रेटरी सुरेश जाधव,खजिनदार अतुल वाणी,माजी मुख्याध्यापक पी.एल.गायकवाड आदी उपस्थित होते.
३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून सर्वत्र साजरा होता,या निमित्ताने पनवेलमध्ये दिव्यांगांच्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.पनवेलचे डॉ.नंदकुमार जाधव फाऊंडेशनच्या बौध्दिक अक्षम मुलांची विशेष शाळा आणि रायगड जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभागाने सयुक्त विद्यमाने क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.क्रिडा स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगांना प्रोत्साहन मिळावे याकरीता दिव्यांगाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील १८ दिव्यांग शाळा सहभागी होणार आहेत तर ४ वयोगटांमध्ये ही स्पर्धां होणार आहे.५० मीटर धावणे, स्पॉट जंप,सॉफ्ट बॉल थ्रो, १०० मिटर धावणे,गोळा फेक, लांब उडी,आदी स्पर्धां होणार आहेत.स्पर्धेत २०० दिव्यांग विद्यार्थी आणि सुमारे १५० शिक्षक सहभागी होतील असा अंदाज आहे.रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डॉ. भरत बास्टेवाड,जिल्हा समाज कल्याण अधिकारी शामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धां होणार आहे.
Post a Comment