राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) पनवेल शहर जिल्हाध्यक्षपदी सतीश पाटील
पनवेल- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) पनवेल शहर जिल्हाध्यक्षपदी सतीश पाटील यांची आज निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने व तसेच प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने सतीश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,प्रदेश सचिव सुरदास गोवारी,महिला प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर,जिल्हा प्रभारी अध्यक्ष प्रमोद बागल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment