ओवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलेश गायकवाड
पनवेल- पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ओवळेच्या उपसरपंचपदी निलेश नामदेव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपसरपंचपदी निलेश गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वचस्तरातून अभिनंदन होत आहे.माजी सरपंच नामदेव गायकवाड,विद्यमान सरपंच रुपेश गायकवाड,त्याचप्रमाणे विश्वनाथ मुंगाजी,सुनील पाटील,पुंडलिक पाटील,तुळशीराम घरत,सदाशिव गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर निलेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.गावाची समाजसेवा तर करतच आहे पण यापुढेही ती जोमाने करणार असल्याचे सांगितले.
Post a Comment