सतीश पाटील यांची अजित पवार गटाला सोडचिठ्ठी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुनश्च: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
पनवेल- सतीश पाटील यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते पक्षप्रवेश केला.रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सतीश पाटील यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश करून सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेवून शरद पवार यांच्या आशिर्वादाने आणि प्रातांध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर माजी जिल्हाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांचा अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन पुनश्च: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. प्रशांत पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष पनवेल शहर श्री. प्रमोद बागल, जिल्हा सरचिटणीस श्री. आनंद भिंगार्डे, युवक जिल्हाध्यक्ष शैबाज पटेल आणि अश्फाक पटेल उपस्थित होते.
Post a Comment