मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात: पादचारी महिला जखमी, खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
पनवेल (संजय कदम): मुबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खांदेश्वर पोलीस ठाणेहद्दीत एका कारचा अपघात झाला असून या अपघातात पादचारी महिला महिला जखमी झाली आहे.मारुती सेलेरिओ कार क्रमांक -MH01DB-2382 कार वरील चालक दिलीप उदय राणी (वय 44) हे त्यांचे ताब्यातील कार चालवीत घेऊन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबई बाजूकडे जात असताना किमी 2/700 येथे आले असता अर्चना महादेव माने (वय-40) रा. विचुंबे ही पादचारी महिला मुंबई लेन वरून पुणे लेन कडे पायी चालत रोड क्रॉस करत असताना कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून अर्चना महादेव माने यांना ठोकर लागून गंभीर दुखापत अपघात झाली आहे. सदर अपघातामध्ये महिला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचाराकरिता एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे खाजगी वाहनाने दाखल करण्यात आले आहे.सदर अपघातग्रस्त वाहन रोडचे बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू आहे. अपघाताचे ठिकाणी पळस्पे मोबाईल वरील स्टाफ तसेच व आय आर बी स्टाफ हजर होते. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Post a Comment