पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक वाचकांसाठी पर्वणी ठरेल - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल -महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील घडामोडी,प्रसिद्ध लेखक-कवींचे साहित्य यामुळे पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक वाचकांसाठी पर्वणी ठरेल असे उद्गार लोकनेते,माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या दिवाळी विशेषंकाच्या प्रकाशन समारंभ केले.या प्रकाशन समारंभ प्रसंगी उद्योजक नंदू वाजेकर,माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी,पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम,सुंमत नलावडे उपस्थित होते.
यापुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले,दिवाळी अंकातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते.दिवाळी सण म्हटलं की उटण,फटाके, फराळ तसा मराठी वाचकांसाठी आवश्यक बौध्दिक फराळ म्हणजे दिवाळी अंक,या दिवाळी अंकाची अनेक वर्षांची परंपरा पनवेल टाइम्सने जपली आहे.सद्यस्थितीतील सामाजिक घडामोडी, विविध प्रकारचे साहित्य यामुळे पनवेल टाइम्सचा दिवाळी अंक वाचकांना आवडेल असे शेवटी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात,दिवाळीसारख्या उत्सवातून महाराष्ट्राची संस्कृती जपली जात आहे. फराळाप्रमाणेच दिवाळी अंकातून वाचन संस्कृती जोपासली जाते.महाराष्ट्रातील वास्तव घटनांचा पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकातून घेतला असल्याचे पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी सांगितले.
Post a Comment