News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

खेलो इंडिया पश्चिम विभाग स्पर्धेत रायगडची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळीने पटकावले दोन सिल्व्हर मेडल

खेलो इंडिया पश्चिम विभाग स्पर्धेत रायगडची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळीने पटकावले दोन सिल्व्हर मेडल

पनवेल (संजय कदम): खेलो इंडिया पश्चिम विभाग स्पर्धेत रायगडची कन्या स्नेहल माळीने दोन सिल्व्हर मेडल पटकावत जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिले आहे. दरम्यन स्नेहलने चकमदार कामगिरी केल्याबद्दल तिचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृहनेते नगरसेवक परेश ठाकूर ह्यांनी आभिनंदन केले आहे. 
 
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत सुरू असलेल्या  पश्चिम विभाग वुमन्स सायकल लिग स्पर्धेत (महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड गोवा,कर्नाटक,गुजरात) या राज्यातुन सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत अनेक राष्ट्रीय , राज्य स्तरावरील पदक विजेते खेळाडू हे बारामती येथे पार पडल्या स्पर्धेत सहभागी झाले.यात रायगड जिल्ह्यातील स्नेहल शत्रुघ्न माळी हिने टाईप ट्रायल १० किमोलिटर व मास स्टार्ट ३० किलोमीटर या दोन प्रकारात  दोन सिल्व्हर मेडल पटकवले आहेत.या स्पर्धेचे बक्षीस सभारंभ भारताचे महिला व्हाॅलीबाॅल संघाचे कर्णधार निर्मल तनवर ह्याचे हस्ते पार पडले तर शरयु मोटर्सचे संचालक शर्मिलाताई पवार ह्याचे हस्ते उद्घाटन झाले. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, राष्ट्रीय महिला प्रशिक्षक दिपाली पाटील व फेनिक्स सायकलिंग क्लब चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे ह्याचे बहुमोल मार्गदर्शन स्नेहलला लाभले आहे.या तिच्या यशाबदल सर्व स्तरावरून तिचे आभिनंदन होत आहे. दरम्यान गुजरात येथे होणारे नॅशनल खेलो इंडिया स्पर्धेत स्नेहल हि पश्चिम विभाग वुमन्स सायकल  (महाराष्ट्र राजस्थान छत्तीसगड गोवा कर्नाटक गुजरात) या राज्यातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.स्नेहल शत्रुघ्न माळी हि पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हिच्या कन्या आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment