उलव्यामध्ये नवरात्रीचा उत्साह : प्रितम म्हात्रेंनी घेतले देवीचे दर्शन
नवी मुंबई - नवी मुंबई परिसरात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो, नवी मुंबईला लागूनच उलवे शहरामध्ये यावर्षी नवरात्रीचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील श्री.सचिन राजे येरुणकर यांच्या आम्ही उलवेकर मित्र मंडळ सेक्टर 17 मधील नवसाला पावणारी उलवेची कुलस्वामिनीचे आशीर्वाद घेऊन शेकाप नेते आणि प.म.पा.चे माजी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी उलवे येथे दर्शनाला सुरुवात केली.जगदंब कच्छ पटेल पाटीदार लेवा समाजाच्या उलवेमधील पहिल्या जगदंबा देवीच्या मंदिरात श्री.कांजीभाई पटेल आणि श्री.दीपक पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.
उलवेमध्ये बंगाली समाजाने स्थापन केलेल्या सेक्टर 9 उलवे नोड येथील बंगाली वेल्फेअर ट्रस्टच्या नवरात्र उत्सवामध्ये सर्व परिसरातील दांडिया रसिक शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून रास दांडिया खेळतात त्या ठिकाणी जाऊन देवीचे दर्शन घेतले.उलवे येथील श्री. राम मित्र मंडळ (सेक्टर 5), शिवसंघर्ष प्रतिष्ठान (से.20), जय अंबे मित्र मंडळ (सेक्टर 18) व अन्य ठिकाणी भेट देऊन बक्षीस समारंभाला उपस्थित राहून गरबा रसिकांना नवरात्र उत्सवाच्या प्रितम दादांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment