नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल तालुका हद्दीत मनाई आदेश लागू
पनवेल- ग्रामपंचायत निवडणूका असलेल्या कार्यक्षेत्रात निवडणकीच्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (1)(प)अन्वये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरीता मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 01 मधील एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीत वाघिवली ग्रामपंचायत व परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा नवी मुंबई, पोलीस उप आयुक्त् प्रशांत मोहिते यांना प्रदान अधिकाराने निवडणूक कार्यक्षेत्रात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार मनाई आदेश जारी करण्यात आले आहे.
नवीमुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 01 मधील एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीत वाघिवली ग्रामपंचायत व परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पो. ठाणे हद्दीत दुंदरे, चिखले, सोमटणे, भिंगार, कसळखंड, माळडुंगे व कोन ग्रामपंचायत तसेच पनवेल शहर पो.ठाणे हद्दीत दापोली ओवळे,गिरवले ग्रामपंचायत खांदेश्वर पो.ठाणे हद्दीत विचुंबे, देवद ग्रामपंचायत उरण पो.ठाणे हद्दीत चिरनेर, दिघोडे, जासई ग्रामपंचायत व न्हावाशेवा पोलीसठाणे हद्दीत न्हावे ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत. त्याअनुषंगाने आदर्श व आचारसंहिता दि.03/10/2023 रोजी पासून लागू झाली आहे. रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल अशारितीने कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे, फलक लावणे, खांबावर झेंडे लावणे यास या आदेशाच्या तारखेपासून पोलीस स्टेशन हद्दीत निवडणूक प्रक्रीया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंध करण्यात आहे.
विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स,कापडी फलक, पोस्टर् लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहीणे, कमान,पताका, कट आउट लावणे किंवा चिन्हे वापरतात. त्यामुळे अनेकवेळा दोऱ्या, काठ्या व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येऊन रहदारीस अडथळा होतो. प्रचाराच्या कालावधीत अशा किरकोळ कारणावरुन वाद निर्माण होऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे काळात कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत अथवा आवारात पोस्टर, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक लावणे, नोटीसा चिकटविणे, घोषणा लिहिणे इत्यादीचा वापर करावयाच असल्यास त्यांनी प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. पोलीसांचा ना हरकत दाखला घेणे देखील बंधनकारक राहील. सदर मनाई आदेश दि.25/10/2023 रोजी 00.01 वाजलेपासून ते दि.09/11/2023 रोजी 24.00 पावेतो लागू राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
आदर्श व आचारसंहिता दि.03/10/2023 रोजी पासून लागू झाली आहे. दि.16/10/2023 (सोमवार) ते दि.20/10/2023 (शुक्रवार)वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत नामनिर्देशन पत्रे तयार करण्यात आलेली आहेत. तसेच दि.23/10/2023 (सोमवार) रोजी सकाळी 11.00 वा.पासून नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आलेली आहे. दि.25/10/2023 रोजी दुपारी 03.00 वा.पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे तसेच दि.25/10/2023 रोजी दुपारी 03.00 वा. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द् करणे. दि.05/11/2023 (रविवारी) रोजी सकाळी 07.30 वा.पासून ते सायंकाळी 05.30 पर्यंत मतदान व दि.06/11/2023 (सोमवार)रोजी मतमोजणी (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार)होणार आहे. जिल्हाधिकारी, रायगड कार्यलयामार्फत निवडणूकीच्या निकालांची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख 09/11/20233 (गुरुवार) रोजीची आहे.
Post a Comment