News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विस्टा फुड्स कंपनीच्या सीएसआर फंडातून पटवर्धन चॅरिटेबल ट्रस्टला ३ लाख तर गुळसुंदे येथील गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेस २ लाखांची आर्थिक मदत

विस्टा फुड्स कंपनीच्या सीएसआर फंडातून पटवर्धन चॅरिटेबल ट्रस्टला ३ लाख तर गुळसुंदे येथील गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेस २ लाखांची आर्थिक मदत

पनवेल -: तळोजा एमआयडीसीमधील विस्टा फुड्स कंपनीने सीएसआर फंडातून परिसरातील संस्थांसाठी आर्थिक मदतीची परंपरा कायम ठेवत रुग्णसेवेसाठी पनवेलच्या पटवर्धन हॉस्पिटलला 3 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. 

२०१८ पासून सातत्याने विस्टा कंपनीतर्फे पटवर्धन हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येते. किडनीच्या विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना डायलिसिसचा खर्च झेपत नाही.अशा गरीब व गरजू रुग्णांना सदर रकमेतून आर्थिक सवलत देण्यात येते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एम.डी. भूपिंदर सिंग व कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी रुग्णालयाचे कार्यवाह राजीव समेळ व प्रशासकीय अधिकारी सुनिल लघाटे यांच्याकडे सदर ३ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेला आदिवासी समाजातील रुग्णसेवेसाठी रुपये २ लाखांचा धनादेश कंपनीतर्फे देण्यात आला. गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेतर्फे मुख्य विश्वस्त मिनेश गाडगीळ यांनी २०१२ पासून गुरसुंदे आकुळवडी, लाडीवली येथील आदिवासी समाजासाठी रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले आहे.  मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया इत्यादी रुग्णसेवा डॉ. दीपक कुलकर्णी,  शंकराआय हॉस्पिटल, महेश गाडगीळ व परिसरातील नागरिकांच्या  सहकार्याने रुग्णसेवा व इतर सामाजिक सेवा सातत्याने सुरू ठेवली आहे. यावर्षी विस्टा कंपनीकडून मिळालेल्या दोन लाखांच्या मदतीने आदिवासी वाड्यांवर प्रायोगिक तत्त्वावर शौचालय बांधण्याचा मनोदय संस्थेचे विश्वस्त व महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार विजेते मिनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी विस्टा कंपनीचे एम.डी. भूपिंदर सिंग तसेच कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचे कौतुक केले.  या दोन्ही संस्थांनी कंपनीच्या या सामाजिक जणीवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी विस्टा कंपनीचे तळोजा येथील प्लांट हेड प्रवीण ठाकूर एच.आर.डिपार्टमेंटच्या इंद्रायणी मॅडम व अधिकारी प्रथमेश पाटील, प्रोडक्शन मॅनेजर अमोल खुणे,कमर्शियल मॅनेजर अमित बापट यांच्यासह इतर अधिकारी व मॅनेजर उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment