कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची पारगावच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी
पनवेल : पनवेल तालुक्यातील कोल्ही गाव हे स्वतंत्र गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची ग्रुप ग्रामपंचायत पारगाव यांच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी खा.श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह, हितेश नाईक, साहिल नाईक आदींनी खा.श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना सरपंचअहिल्या बाळाराम नाईक यांच्या मागणीचे हे पत्र दिले.या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि ग्रुपग्रामपंचायत पारगाव ता.पनवेल हद्दीत कोल्ही हे गाव आंतरराष्ट्रीय विमानतळात मोडत असल्याने त्याचे पुनर्वसन झाले आहे. सदरचे पुनर्वसन वडघर हद्दीतील झाले आहे.तरी सदरचे कोल्ही गाव म्हणून घोषित करावे व त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी ग्रामसभा ठराव प्रत सुद्धा जोडली आहे.या निवेदनाची खा. श्रीरंग बारणे यांनी दखल घेत या मागणी संदर्भात स्वतःचे पत्र तयार करून ते जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल व पाठपुरावा केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले आहे.
Post a Comment