News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल परिसरात गेल्या २४ तासांत २ वेगवेगळ्या वाहनांना लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही

पनवेल परिसरात गेल्या २४ तासांत २ वेगवेगळ्या वाहनांना लागली आग; सुदैवाने जीवितहानी नाही

पनवेल : पनवेल परिसरात गेल्या २४ तासांत २ वेगवेगळ्या वाहनांना लागलेल्या आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. 
पहिल्या घटनेत तालुक्यातील नांदगाव येथे एक डिझेल टँकरला आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी पनवेल  वाहतूक पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून ही आग विझवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दीत नांदगावजवळ असलेल्या कटच्या ठिकाणी डिझेलने भरलेला टॅंकरला आग लागली होती. त्यावेळी डी पॉइंट येथे कर्तव्यावर असलेले पोलिस नाईक संदीप पाटील, पोलिस शिपाई रुपेश ठाकुर, पोलिस नाईक दांडेकर  यांना मदतीकरता बोलावले तसेच अग्निशमक आणि पनवेल शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व त्यांचे पथक तसेच अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. तत्पूर्वी टँकरची आग वाढत असल्याने टँकर क्रमांक एम एच ०९ एफ एल ९६२२ मध्ये डिझेल असल्याने पुढील अनर्थ टाळण्याकरता वाहतूक पोलिसांनी अग्निशमक दलाची वाट न पाहता त्यांच्या खाजगी वाहना मधील फायर इस्टीमेशनचा वापर करून तसेच हायवेवरील वाहनांना थांबवून त्याच्या कडील फायर इस्टीमेटची मदत घेऊन स्वता पुढकार घेत आगिवर नियंत्रण मिळवल्याने पुढील खुप मोठा अनर्थ टळला. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खारघर मधील थ्री स्टार हॉटेल जवळील सिग्नला उभ्या असलेल्या कारने अचानकपणे पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कार मधील प्रवासी गाडी बाहेर पडले. तेथील जागृत नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवली. त्यानंतर अग्निशमकदलाचे बंब घटना स्थळी येथून त्यांनी आग विझवली. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment