कर,हरकत विषयासंदर्भात जनजागृती पूर्णपणे झाली नाही : महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प पनवेल महानगरपालिकेने आयोजित करावा- माजी नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी
पनवेल (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेच्या करासंदर्भात तसेच इतर हरकत अर्ज विषयासंदर्भात कळंबोली वॉर्ड ऑफिस ठिकाणी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करावी अशी मागणी माजी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात रवींद्र भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कळंबोली वसाहतीच्या घरांची संख्या १ लाख असून पनवेल महानगरपालिकेने करासंदर्भात तसेच इतर हरकत अर्ज विषयासंदर्भात ९ ऑगस्ट व १० ऑगस्ट रोजी कॅम्प आयोजीत केले होते,परंतु नागरीकांपर्यंत याची जनजागृती पुर्णपणे झाली नसल्याने नागरिकांना आपल्या हरकती सादर करण्यास जमले नाही. त्यामुळे कळंबोली वॉर्ड ऑफिस या ठिकाणी पुन्हा १० ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत पनवेल महानगरपालिका आली आपल्या दारी कॅम्प आयोजित करण्यात यावा अशी मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे.
Post a Comment