खड्ड्यांची ओवाळणी करताच खड्डे बुजले! शेकापचे महादेव वाघमारे यांच्या आंदोलनाला यश
पनवेल : पनवेलजवळील खांदा कॉलनी सिग्नल येथे शेकापकडून खड्डे पूजन करून आंदोलन करण्यात आले होते लगेच दुसऱ्याच दिवशी पनवेल महानगरपालिकेकडून आंदोलनाची दखल घेऊन खडी,रेती टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले आहेत.
खांदा वसाहतीमधील रस्त्यावर पडलेल्या खड्यांबाबत शेकापचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी अनोखा आंदोलन छेडत त्या खड्यांचे पूजन केले होते या आंदोलनाची दखल घेत महानगरपालिके कडून आंदोलनाची दखल घेऊन खडी,रेती टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात सुरुवात करण्यात आली आहे परंतु सद्या पाऊस पडत असल्याने पुन्हा खड्डे जैसे थे होतील, त्यासाठी डांबराने खड्डे दुरुस्ती करावेत अशी आंदोलनकर्ते महादेव वाघमारे यांनी महानगरपालिकेकडे मागणी केली आहे तसेच जोपर्यंत खड्डे डांबराने दुरुस्ती होत नाही तोपर्यंत वेळोवेळी आंदोलने केली जातील असा इशारा शेकापचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पनवेल महानगरपालिके दिला आहे.
Post a Comment