स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव : प्रखर देशभक्तीची भावना जनमानसात रहावी,यासाठी ‘घरोघरी तिरंगा’अभियान
रायगड - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहान जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात,या लढ्यातील क्रांतिकारक अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे,प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता समारोप कार्यक्रमानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी घर,इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा.केंद्र शासनाने जिल्ह्यातील टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.या अभियानातर्गत घरोघरी तिरंगा हा १३ ते १५ ऑगस्टदरम्यान फडकलेला असेल.. या तीनही दिवशी नागरिकांना आपल्या घरी,इमारतीवर दिवसा व रात्री (अखेरच्या दिवशी सूर्यास्तापर्यंत) राष्ट्रध्वज फडकवता येईल.ध्वज फडकवताना भारतीय संहितेतील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.मात्र या कालावधीत देखील सर्व कार्यालयांना ध्वजसंहिता पाळावयाची आहे.सर्वांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन डॉ.म्हसे यांनी केले आहे.
Post a Comment