धुळखात पडलेल्या समाजसेवा केंद्राच्या फलकाला सडलेल्या फुलांचा हार : प्रशासनाला जागे करण्यासाठी कामोठ्यातील जागृत नागरिकांनी फटाके फोडले
पनवेल - कामोठ्यात धुळखात पडलेल्या समाजसेवा केंद्राच्या फलकाला सडलेल्या फुलांचा हार घालण्यात आला,त्याचा निषेध म्हणून कामोठ्यातील समाजसेवक व शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहराध्यक्ष अमोल शितोळे यांनी त्यांच्या सहकार्यासह फटाके फोडले.
चार कोटी रुपये खर्च करुन सिडकोने नागरिकांसाठी समाजसेवा केंद्र बांधले आहे.सदर बांधकाम एप्रिल 2018 रोजी पूर्ण झाले.आजमितीस पाच वर्षे झाली, इमारतअशीच धूळखात पडून आहे.इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वाळवी लागली आहे पण सिडको प्रशासन खुर्च्या गरम करत दिवस ढकलत आहे, याचा निषेध म्हणून समाजसेवा केंद्र या फलकला सडलेल्या फुलांचा हार घालण्यात आला आणि गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी फटाके फोडण्यात आले.
फटाक्यांचा आवाज ऐकून तरी अधिकारी केबिन बाहेर आले.
Post a Comment