महानगरातील खोदकाम केलेल्या रस्ते दुरुस्ती कामात निष्काळजीपणा:पनवेल महानगरपालिकेच्या कारभारभाराविरोधात मनसे आक्रमक
रस्ते दुरुस्ती कामात निष्काळजीपणा असून या पनवेल महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
मागील तीन महिन्यापासून नवीन पनवेल येथील सेक्टर ६ ते आदई सर्कल दरम्यान महानगर गॅस या कंपनीने नवीन गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले होते.काम करण्यापूर्वी महानगरपालिकेने या विभागात रस्त्यांचे काम पूर्ण केले होते. महानगर गॅस कंपनीला जाग आली की गॅसचे पाईपलाईन टाकण्याचे काम राहिले. त्यानंतर रस्त्यांची खोदकाम करुन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करुन तेथील रस्त्याचे काम निष्काळजीपणे अर्धवट सोडले होते. काही दिवसापूर्वी या खड्ड्यांमध्ये ट्रक अडकून प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अशाच प्रकारे काल मनसे सैनिकाची गाडी त्या खड्यात अडकून गाडीचे नुकसान झाले.
अशा कित्येक घटना वारवार होडुन सुद्धा महानगरपालिका त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी कोणताही मोठा अपघात घडू होडु शकतो याबाबत मनसे रस्ते आस्थापना पनवेल तालुका संघटक दिपेश पोपेटा व नवीन पनवेल प्रभाग १६ विभाग अध्यक्ष अंकुर पाटील यांनी काम तातडीने पूर्ण करण्याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या शहर अभियंता यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले.या निवेदनात काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार आपण असाल असेही सूचित केले गेले.
Post a Comment