वाहतूक कोंडी ...हे घ्या वाहतूक अधिकाऱ्यांचे नंबर! शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांचा पुढाकार
पनवेल- पनवेल शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग,दीर्घकाळ वाहतूक कोंडी यावर कारवाई व्हावी म्हणून शिवसेनेचे महानगरप्रमुख अॅड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देऊन दिलासा दिला आहे. सदर संपर्काचे फलक पनवेल शहरांमध्ये लावण्यात आले आहेत.
पनवेल शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे. प्रत्येक चौकात कर्मचारी ठेवू शकत नाही, पण मग ज्या वेळेला अचानक वाहतूक कोंडी होते किंवा कोणीतरी बेशिस्त वाहन पार्किंग करतात अशा परिस्थितीत वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे नंबर सामान्य माणसाकडे नसतात मग तक्रार करायची तरी कशी?? शिवसेनेच्या पाठपुराव्याने वाहतूक विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचे नंबर त्यांच्या परवानगीने सामान्य नागरिकांच्या माहितीस्तव पनवेलमध्ये ट्राफिक होत असलेल्या विविध चौकांमध्ये लावण्यात आले.
टू व्हीलर वरती ताबडतोब कारवाई होते पण मोठी वाहन मात्र सोडून दिली जातात. ऑनलाइन चलनांच्या नावावर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांना कुठलीच तोशीश लागत नाही आणि वाहतूक पोलीस कारणे देतात पुरेसे जॅमर नसल्याबाबत,पनवेल शहर शिवसेनेच्या माध्यमातून प्रथमेश सोमण यांनी स्वखर्चाने वाहतूक विभागाला आठ नवीन जॅमर दिले.
Post a Comment