कळंबोलीत स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव समारंभ मैदाना अभावी रस्त्यावर साजरा,मागणी करूनही मिळत नाही मैदानासाठी परवानगी
कळंबोली (दीपक घोसाळकर): राज्यात स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव समारंभ दिमाखात साजरा होत असताना मात्र कळंबोलीतील एका शाळेला अमृत महोत्सवाचा उत्सव हा मैदाना अभावी रस्त्यावर साजरा करण्याची वेळ आली.शाळेच्या बाजूलाच सिडकोने निर्माण केलेलं मैदान आहे.मात्र ते मैदानच गायब झाल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे.याबाबत महापालिकाकडे वारंवार मागणी करूनही विद्यार्थ्यांना मैदान मिळत नाही याची खंत विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये सेक्टर १० मध्ये एका खाजगी संस्थेची इंग्रजी माध्यमाची पहिली ते दहावीपर्यंत न्यू मुंबई इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे.शाळेच्या बाजूलाच सिडको निर्मित मैदान व उद्यान आहे .तसा फलकही त्या उद्यानाच्या बाहेर लावलेला आहे. मात्र येथील खुले मैदान हे अनेक वर्षापासून गायब आहे .या शाळेतील मुले या बाजूच्याच उद्यानातील मोकळ्या जागेवर खेळतात बागडतात व आपले शारीरिक शिक्षण चे धडे तिथे घेतात.मात्र काही तुरळक रहिवाशांच्या तक्रारीमुळे तिथे विद्यार्थ्यांना कोणतीही कवायत करू दिली जात नाही,किंवा त्या मैदानाचा वापर करू दिला जात नाही.याबाबत सिडको व महापालिकडे लेखी तक्रार व मैदान वापरण्यासाठी मिळण्याची मागणी ही करण्यात आली आहे .
याबाबतची दस्तूर खूद तक्रार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका चिमुकलेले लेखी पत्रा नुसार केली होती .त्यावेळी दिल्लीतून थेट गल्लीपर्यंत सूत्रे हलली .सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शाळेत शाळेत येऊन थेट विद्यार्थ्यांशी हितगुज केले.जागेवर येऊन सर्व स्थितीची पाहणी केली व लवकरच विद्यार्थ्यांना खुले मैदान मिळेल असे वचनही दिले.मात्र त्यानंतर पुन्हा प्रशासकीय लाल फीतीत या खुल्या मैदानाची मागणी अडकल्याने या विद्यालयातील विद्यार्थी मैदानापासून वंचित आहेत. राज्यात एकीकडे आजादी का अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात आणि शानदार पणे साजरा होत असताना या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मात्र आपला आजादी का अमृत महोत्सव शाळेच्या समोरील मोकळ्या रस्त्यावर करावा लागला.तोही कार्यक्रम दिमागदार पद्धतीने विद्यार्थ्यांनी केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांच्या ही डोळ्याची पारणे फिटले.महापालिकेने या विद्यार्थ्यांची व विद्यालयाची मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विद्यालयाच्या बाजूलाच असलेले मैदान मुलांच्या शारीरिक शिक्षणासाठी देण्यात यावे अशी मागणी आता पालकांमधूनही जोर धरू लागली आहे.
Post a Comment