पनवेलच्या वाहतूक कोंडीबाबत शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेनेने घेतली उपायुक्तांची भेट ..
पनवेल - येऊ घातलेल्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमी वरती पनवेलमध्ये वाहतूक कोंडी हळूहळू वाढत चालली आहे पार्किंगच्या,बेशिस्त वाहनचालक वाढलेली लोकसंख्या व त्या प्रमाणात कमी असलेले वाहतूक पोलिसांचे कर्मचारी यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी व त्याच्या समस्या पनवेलमध्ये वाढत असताना पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख,माजी नगरसेवक ॲड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी शहरातल्या प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसह नवी मुंबईचे वाहतूक उपायुक्त श्री तिरुपती काकडे यांची पनवेल येथेच भेट घेतली तिरुपती काकडे यांनी काल स्वतःहून रस्त्यावर उतरत वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत पनवेलमध्ये नेहमीच्या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
यावेळी अशा ठिकाणी "फिक्स पॉईंट" तत्त्वावर किमान पुढील चार ते सहा महिने वाहतूक विभागाचे कर्मचारी किंवा ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याची विनंती शिवसेनेतर्फे करण्यात आली त्याचप्रमाणे शहरात ज्या ठिकाणी साधारणतः नित्याचीच वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी तक्रार करण्यासाठी वाहतूक विभागाने स्वतःचे नंबर जाहीर करावेत अशी मागणी सुद्धा शिवसेनेने केली.तथा पार्किंगच्या विषयात किंवा अन्य कुठल्याही संबंधित खात्याकडून वाहतूक नियमन होण्यासाठी आवश्यकता पाठपुरावा शिवसेना स्टाईलने करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले.तिरुपती काकडे यांनी यावेळेस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
याप्रसंगी प्रथमेश सोमण यांच्या समवेत शहरप्रमुख प्रसाद सोनावणे,शहर संघटक अभिजीत साखरे,उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी,विभागप्रमुख आशिष पनवेलकर, मंदार काणे,वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment