News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सामाजिक बांधिलकी जपत कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातर्फे आदिवासी पाड्यात शिधा वाटप

सामाजिक बांधिलकी जपत कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातर्फे आदिवासी पाड्यात शिधा वाटप

पनवेल (संजय कदम) : पनवेलमधील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज संस्थेच्यावतीने सामाजिक उपक्रमाअंर्तगत आदिवासी बापदेव वाडी,गाढेश्वर येथील ३५ कुटूंबांना शिधा वाटप करण्यात आले. 

बांधकाम व्यावसायिक व कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापदेववाडी समाज मंदिरात ३५ कुटुंबांना तांदुळ,डाळ, तेल व इतर वस्तु आदी शिधाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मंगेश परुळेकर,उपाध्यक्षा नंदा नाईक,सचिव यतीन ठाकूर,खजिनदार विनायक तिरोडकर व कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण पनवेलचे सर्व सभासद यांच्यासह बापदेव वाडीतील पुरुष,महिला तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मंडळातर्फे वाडीसाठी लोकांच्या गरजा ओळखून त्याना भविष्यातही अशा प्रकारची मदत करु असे सांगितले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी प्रभु यांनी केले. 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment