लाल ... लाल पाण्याची गाढी नदी ... : २००५ च्या महापूरातही असे लाल पाणी नव्हते
पनवेल - डोंगर माथ्याचा भाग असलेल्या पनवेल तालुक्यातून पनवेल शहराकडे येणाऱ्या गाढी नदीचे पाणी लाल ..लाल दिसत आहे.डोंगरातूनच लाल पाणी येत असल्याने गाढेश्वर धरण आणि गाढी नदीचे पाणी लालच लाल झाले आहे.
माथेरानच्या डोंगरातून उगम पावत असलेली गाढी नदी पनवेलच्या खाडीला मिळते.गाढी नदीवर पनवेल महानगरपालिकेचे स्वतःचे गाढेश्वर धरण आहे.
माथेरानचे डोंगर..धरण.. धरणातून सोडलेले पाणी अशातून ही पुढे नदी वाहते.गेली अनेक दिवस पनवेल भागामध्ये अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस पडत आहे.डोंगर भागातूनच पाणी हे लाल येत आहे,त्यामुळे धरणातले पाणी सुद्धा लाल झाले आहे आणि ते पाणी पुढे धरणातून नदीच्या पात्रात सोडले जाते.२००५ चा महापूर झाला त्यावेळेसही असे लाल पाणी आले नव्हते असे एका ज्येष्ठ नागरिकांने बोलताना सांगितले.
Post a Comment