तब्बल १३ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने धडक मोर्चा
पनवेल - तब्बल १३ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
रायगड जिल्ह्यातील माणगाव प्रांताधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा नेण्यात येणार आहे दि.४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता माणगाव बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे.
मागील तेरा वर्षापासून कोकणकर मुंबई-गोवा महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.एखादा अपघात घडला किंवा एखादा आजारी व्यक्तीला मुंबईत पुढील उपचारासाठी घेऊन येताना अशा खड्ड्यामुळे मार्ग महामार्गावर रस्त्यातच जीव सोडावा लागतोय.या महामार्गावर आजपर्यंत तीन हजार तीनशे पेक्षा जास्त कोकणकरांनी आपला प्राण गमावला आहे.अनेक कोकणकरांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.
समृद्धी महामार्ग सुसज्ज अशा सुविधांसह अवघ्या पाच वर्षात बनू शकतो परंतु आपला महामार्ग तेरा वर्षे उलटूनही देखील पूर्ण होण्याचे चित्र दिसत नाही.आज कोकण मुंबई पासून हाकेच्या अंतरावर आहे पण सुसज्ज सोयी सुविधा नसल्याने विकासात्मक दृष्ट्या कोकणकर पाठीमागे आहे,यामुळेच कोकणातील खेडी ओसाड होताना दिसत आहेत. पहिल्या दोन दिवसाच्या पावसाने महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे काळ कधी कोणावर चालून येईल याची शाश्वती नसल्याने एखादा अपघात घडून एखाद्याचे कुटुंब उध्वस्त होऊ शकते. हे अपघात थांबवायचे असतील तर या महामार्गासाठी कोकणकर जनतेने मोठ्या संख्येने या चळवळीत सामील होणे गरजेचे आहे अन्यथा अजून पाच वर्षे याच खड्ड्यातून प्रवास करावा लागेल.या मोर्चात कोकणकरांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment