१२४ वाहतूक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या : २ वर्ष पूर्ण झालेल्यांना दुसऱ्या शाखेत संधी
पनवेल - : दोन वर्ष आणि त्याहून अधिक काळ एका वाहतूक शाखेमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या १२४ अंमलदारांच्या इतर वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.संबंधित बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी त्वरित हजर होण्याचे सूचित करण्यात आले आहे त्यांना लगेच कार्यमुक्त करण्याचे ही आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियमन करण्याकरिता त्या-त्या ठिकाणी युनिट कार्यरत आहेत. या भागातून महामार्ग तर जात आहेतच. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांची संख्या ही मोठी आहे. हायवे बरोबरच आत मधील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी होण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे.दरम्यान पूर्वी वाहतूक शाखेत बदली झाल्यानंतर सहा वर्षे संबंधित अंमलदार त्याच युनिटला काम करत असत.मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये दोन वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची वाहतूक विभागाच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार यंदा एकूण १२४ अंमलदारांच्या दुसऱ्या युनिटला बदली करण्यात आले आहे.
Post a Comment