.....आम्ही सुनील तटकरे यांच्या पाठीशी : मंत्री आदिती तटकरे यांचे पनवेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत
पनवेल- महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी आदिती तटकरे यांनी शपथ घेतल्याबद्दल पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी आणि तमाम कार्यकर्त्यांच्यावतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले आहे.
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण कार्यकारणी आणि तमाम कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुनील तटकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे आहेत आणि वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये तटकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आदिती तटकरे यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तमाम कार्यकर्त्यांनी पनवेल शहरांमध्ये घेतलेला आहे.
पनवेलच्या पाण्याच्या प्रश्नापासून ते जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये खासदार सुनील तटकरे आणि त्यानंतर अदिती तटकरे यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे तमाम कार्यकर्ते तटकरे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या मागे उभे राहण्याचा निर्णय पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे.
डॉ.शिवदास कांबळे,
माजी नगरसेवक,
कार्यकारी जिल्हा अध्यक्ष
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस
Post a Comment