आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गीतरामायण... जाणीव एक सामाजिक संस्थेचा उपक्रम
पनवेल - जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्यावतीने पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून मोफत प्रवेशिका मिळण्यासाठी माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय पनवेल तसेच लोंढे खानावळ पनवेल तसेच अमोल खेर, स्टेशनरी शॉप टिळक रोड पनवेल येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी उमेश इनामदार 9930905366 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment