दारूच्या नशेतच पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू
पनवेल - : पनवेल तालुक्यातील वावंजे गावा जवळ दारूच्या नशेत पाण्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे त्या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
मनीष कुमार विजयसिंह असे या तरुणाचे नाव असून तो तालुक्यातील वावंजे परिसरात रहात होता व त्याला दारू पिण्याचे व्यसन होते.त्या दारूच्या नशेतच वावंजे येथील अमन इन्फ्रा कंपनीच्या समोरील पाण्याच्या डबक्यात पडला. व त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Post a Comment