रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्षपदी कमांडर दीपक जांबेकर
रोटेरिअन कमांडर दीपक जांबेकर यांची निवड झाली.रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी या क्लबचे दुसरे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
हा पदग्रहण समारंभ खांदा कॉलनी येथील रोटरी कम्युनिटी हॉल येथे संपन्न झाला.कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या गव्हर्नर रोटेरिअन श्रीमती मंजू फडके,असिस्टंट गव्हर्नर रोटेरिअन श्रीमती ऋतुजा भोसले उपस्थित होत्या.रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचे सर्व सदस्य,त्यांचे मित्र परिवार,आप्तेष्ट व रोटरी डिस्ट्रिक्टचे काही ज्येष्ठ अधिकारी ह्यांच्या उपस्थितीत भूतपूर्व चार्टर अध्यक्षा रोटेरिअन श्रीमती ध्वनी तन्ना ह्यांनी क्लबचा कार्यभार रोटेरिअन कमांडर दीपक जांबेकर ह्यांच्या हाती सुपूर्त केला.
या कार्यक्रमाचे चलचित्रीकरण क्लब च्या Youtube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले गेले. कमांडर जांबेकर ह्यांनी त्यावेळी आपली संपूर्ण कार्यकारिणी जाहीर केली. क्लबला पदग्रहणाच्या दिवशी १९ लाखाचा मेडिकल क्षेत्रातला CSR मिळाला. ह्या शिवाय त्यांनी पुढील २ प्रोजेक्ट्सची घोषणा देखील केली.
Post a Comment