पर्यटकांना आकर्षिक करणाऱ्या पनवेलच्या माची प्रबळगडावर पर्यटकांना नो एन्ट्री : प्रशासन सतर्क,कलम १४४ लागू
पनवेल :पनवेल तालुक्यातील माची प्रबळगडावर पर्यटकांना नो एन्ट्री असून पनवेल तहसीलदारांनी कलम १४४ लागू केले आहे.
पनवेलमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.नुकताच इर्शाळवाडीच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे.पनवेलमधील माची प्रबळगड हे पर्यटन नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करत असते.पावसळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.मात्र गडावरील एका सुळक्याला भेगा पडल्याने तहसीलदारांनी सतर्कतेच्या कारणास्तव याठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने डोंगर भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने माची प्रबळ येथील प्रबळगड व कलावंतीण सुळका या भागात धोकादायक दगड असून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने त्या भागात पर्यटक, नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तरी पर्यटकांना प्रबळगड व कलावंतीण सुळका येथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार पनवेल विजय पाटील यांनी दिली.
याबाबत याठिकाणी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे.बंदी असताना देखील पर्यटक चोर मार्गानी गडावर प्रवेश करत असल्याने संपूर्ण परिसरातच कलम 144 लागू करण्यात आले आहे.दरम्यान या गडावर देखील एक आदिवासी वाडी आहे.मात्र या आदिवासी वाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
Post a Comment