उरण विधानसभेतील पुढचा आमदार हा शिवसेनेचा - शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव : शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इनकमिंग ...
पनवेल- खालापूर तालुक्यातील मराठा महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व भाजपचे नेते उत्तम भोईर आपल्या चारशे कार्यकर्त्यांसह तसेच माजी सरपंच संदेश जाधव,माजी उपसरपंच अमित मांडे, किशोर शिंदे,भाग्यश्री पवार,निखिल मोरे, दीपिका भंडारकर,किशोर शिंदे गजानन पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात प्रवेश केल्याने उरण मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसला आहे.
या कार्यक्रमास शिवसेना नेते आमदार,भास्कर जाधव शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,शिवसेना नेते बबन पाटील, माजी आमदार,जिल्हाप्रमुख मनोहर भोईर तसेच नरेश रहाळकर आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांनी,उरण विधानसभेतील पुढचा आमदार हा शिवसेनेचा असून मनोहर भोईर हे मोठ्या फरकाने विजय होतील.आमदार नसतानाही त्यांनी कामाचा झपाटा लावलेला आहे तो अतिशय गौरवण्यासारखा आहे. वेळ पडली तर त्यांच्या प्रचाराला मी सुद्धा उरण मतदारसंघामध्ये येईन असे त्यांनी मेळाव्यात सांगितले.
शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी,उरण विधानसभा मतदारसंघातील मनोहर भोईर यांच्या सारखा साधा आणि स्वच्छ मनाचा माणूस त्यांचा पराभव होतोय ही खंत आजही वाटत आहे.मी त्यांना खूप पूर्वीपासून ओळखते त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला परिचय आहे. त्यांच्या कामाचा झपाटा मी खूप जवळून पाहिलेले आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनोहर भोईर यांना निवडून आणून त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवा असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार,जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी,मी आमदार असो किंवा नसो समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन जनतेची काम करत राहील.आमदार नसताना सुद्धा जवळजवळ ७०-८० कोटीची काम मी या मतदारसंघांमध्ये केलेली आहेत.त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या कामाची पोचपावती २०२४ च्या निवडणुकीमध्ये उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य जनता देईल असे त्यांनी सांगितले.
Post a Comment