News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

विचुंबेकरांना मिळणार नवीन पूल : नवीन पुलाच्या बांधकामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन ...

विचुंबेकरांना मिळणार नवीन पूल : नवीन पुलाच्या बांधकामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन ...

पनवेल -  पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात येणार्‍या नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्‍यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसर्ली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

भूमिपूजन समारंभास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, विचुंबे भाजप गाव अध्यक्ष के. सी. पाटील, देवदच्या सरपंच शीतल सोनावणे, विचुंबे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, माजी सरपंच गणपत म्हात्रे, श्याम पाटील, वामनशेठ वाघमारे, पाली देवद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, नितीन भोईर, राम म्हात्रे, अनिल भोईर, अनंता गायकवाड, अविनाश गायकवाड, उसर्लीचे माजी सरपंच अतुल तांबे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोईर, अमिता राम म्हात्रे, नविता भोईर, संगीता भोईर, अक्षता गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या नीलम भिंगारकर, हर्षला भिंगारकर, भाग्यश्री भोईर, अनिता भगत, डी. के. भोईर, प्रल्हाद भोईर, नयन भोईर, गणेश भिंगारकर, महेश भिंगारकर, नागेश भिंगारकर, आनंद गोंधळी, प्रेम भिंगारकर, संजय भिंगारकर, राकेश मोरे, अर्जुन सुरते, महेंद्र भिंगारकर, महेंद्र म्हात्रे, श्याम म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुप्रिटेंडट इंजिनियर गायकवाड मॅडम, एक्सिक्युटीव्ह रूपाली मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होेते.

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खर्‍या अर्थाने जनसामान्यांच्या हिताचे सरकार म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सामन्यांच्या दृष्टीने जे जे आवश्यक विषय आहेत ते पूर्णत्वाच्या दिशेने नेणे आणि जलद गतीने पूर्ण करण्याचे काम सरकार करीत आहे.विचुंबे व परिसरातील नागरिकांना आता अस्तित्वात असलेल्या अरूंद पुलामुळे निर्माण होत असलेल्या अडचणी मला माहीत आहेत.याबद्दल मला आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्ञात केले आणि नवा पूल बांधणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी यासाठी पाहणी केल्यानंतर जागा पक्की करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हातून हे कार्य व्हावे असे ईश्वरालाही वाटत होते. ऑक्टोबर 2024च्या आधी या पुलाचे उद्घाटनही तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत होईल यात काही शंका नाही, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विचुंबे, देवद, उसर्ली या सर्व ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद क्षण आहे. हा क्षण ज्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणला ते सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार करतो. विचुंबे येथील गाढी नदीवरील नवीन पूल त्यांनी मंजूर केला व आज त्याचा शुभारंभ होतोय. येथे राहणारे गावातील ग्रामस्थ असो की सोसायटीतील रहिवासी असो सगळ्यांच्या भावना या पुलाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आताचा जो पूल अस्तित्वात आहे तो छोटा असल्याने त्या पुलावरून वाहतूक करणे विशेषतः नोकरदार मंडळींसाठी जिकिरीचे बनले आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही समस्या सोडविण्याचा शब्द दिला होता.तो त्यांनी पूर्ण केला आहे. आता नव्या पुलाचे काम सुरू होऊन भविष्यात वाहतूक सुरळीत होईल. या पुलाच्या उद्घाटनालाही मंत्री चव्हाणसाहेबांनी यावे अशी आमची इच्छा आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment