भर पावसामध्ये पाणी प्रश्नासाठी तळोजामध्ये तहान रॅली
पनवेल- भर पावसामध्ये पाणी प्रश्नासाठी पनवेल तालुक्यातील तळोजामध्ये तहान रॅली काढण्यात आली.तळोजा कॉलनी फेडरेशनच्यावतीने तळोजा फेस 1 आणि फेस 2 येथे पाणीप्रश्न सोडविण्या संदर्भात तहान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीस माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी,तळोजकरांचा पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी प्रयत्न करेन,त्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबर बैठका आयोजित करून तळोजकरांवर पाणी वाटपामध्ये जो अन्याय होत आहे त्यावर कायमस्वरूपी तोडगा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले.
यावेळी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.देवेंद्र मढवी,माजी नगरसेवक श्री.ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment