सामाजिक सक्षमीकरण शिबिरातून दिव्यांगांना पनवेल येथे मोफत साहित्य वाटप : मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम
पनवेल - मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि केंद्र सरकारच्या दिव्यांग विभाग,न्याय मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सामाजिक सक्षमीकरण शिबिरातून दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्य वाटप उपक्रमात दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली.मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये राबवण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांना हे विविध साहित्याचे वाटप केले जात आहे.
अंधांसाठी काठी,कर्णबधीर व्यक्तींसाठी कानाचे मशीन,व्हील चेअर,टॉयलेट पॉट आणि इतर साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम दिव्यांग बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर,जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील,पनवेल शहर संघटक प्रथमेश सोमण,पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व लाभार्थी उपस्थित होते.
Post a Comment