महाराष्ट्रातील शुभेच्छांसह माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनीही दिल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ..
पनवेल - लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनीही उलवे येथील एका कार्यक्रमाच्यावेळी शुभेच्छा दिल्या,मित्राच्या वाढदिवसाला मित्राने दिलेल्या या शुभेच्छा.
सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असेलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकासाठी मदतीचा ओघ दिला आहे.वाढदिवसाचे निमित्त असले तरी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील उतुंग व्यक्तिमत्व म्हणून दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सुपरिचित आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक,वैद्यकीय,तसेच क्रीडा स्पर्धा अशी विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आली.राजकारणात असलेले नेते हे सर्वस्वी राजकारणावर अवलंबून असतात पण समाजकारणाचे भान ठेवून काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा राजकारण हा मूळ पिंड नसून समाजकारण हाच त्यांचा गाभा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने समाजसेवेचे व्रत सुरूच आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अभिष्टचिंतनाला उत्तर देताना सर्वांचे आभार मानले तसेच सर्वांचे प्रेम कायम राहू द्या,अशा शब्दात अपेक्षा व्यक्त केली.
Post a Comment